» सामुदायिक व्रतबंधनचित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक संस्थेतर्फे सामुदायिक व्रतबंधन सोहळा वैशाख कृ. ६, शके १९४० रविवार दिनांक ६ मे २०१८ रोजी सकाळी ११.२२ वा. आयोजित केला आहे. व्रतबंधन सोहळा संस्थेच्या गद्रे मंगल कार्यालयात होईल. अधिक माहितीसाठी व नांव नोंदणीसाठी काका गद्रे मंगल कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. वेळ : सकाळी १० ते १ आणि दुपारी ४ ते ८
|
» वृध्दाश्रम संकल्पआपली संस्था वृद्धाश्रमाची उभारणी करणार आहे. त्याकरिता नासिक परिसरामध्ये दोन ते तीन एकर जमीन हवी आहे. ही जमीन नाशिकपासून साधारणत: ३० कि.मी. परिघात असावी. शक्यतो डांबरी रोडला लागून असल्यास वृद्धाश्रमासाठी सोयीचे होईल. संस्था जागेचा योग्य तो मोबदला देऊन जागा खरेदी करेल किंवा आपल्यापैकी कोणाची जागा देणगी स्वरुपात द्यायची असल्यास संस्था त्याबाबतही विचार करेल.
अशी जागा कोणाच्या माहितीत असल्यास संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय साने किंवा कार्यकारिणी सदस्य यांचेशी संपर्क साधावा.
|