अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:।
इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि।।
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik

Chitpavan News and Events News & Events

First « Previous 12 Next » Last

» वैयक्तिक माहिती अर्ज - महत्त्वाची सूचना

*महत्त्वाची सूचना:
==============
चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक सध्या नोंदणीकृत असलेले सदस्य, त्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच इतर सदस्य नसलेले चित्तपावन ज्ञाती बांधव आणि भगिनी यांचा एकत्रित असा डेटाबेस तयार करीत असून याकामी ह्या सप्टेंबर महिन्याच्या चित्तपावन मित्र अंकात आम्ही दोन भाषांमध्ये (मराठी आणि इंग्रजी) वैयक्तिक माहिती अर्ज दिले आहेत. तरी ज्यांना ऑफलाईन अर्ज भरावयाचे आहेत त्यांनी अंकात दिलेल्या पानावर कोणत्याही एका भाषेत पूर्ण माहिती भरून सदर अर्ज गद्रे कार्यालयात कामाच्या वेळांत (सोम. ते शनि. - सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते संध्या. ६:३० ) समक्ष जमा करणे.

तसेच ऑनलाईन अर्ज भरू इच्छीणाऱ्यांसाठी खालील प्रमाणे लिंक्स असतील.
English Form किंवा Marathi Form

कोणत्याही एका भाषेत अर्ज भरणे.

धन्यवाद!
चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिक.» चित्तपावन युवक मंडळ व्याख्यान

चित्तपावन युवक मंडळ, नाशिक आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान

विषय : स्टार्ट-अप आणि पहिल्या पिढीतील उद्योजकता
वक्ते : श्री. हेरंब सहस्त्रबुद्धे
स्थळ : काका गद्रे मंगल कार्यालय, नाशिक
वेळ : शनिवार दि. ३१ /३/२०१८ संध्याकाळी ६:३० वाजता.

==== प्रवेश सर्वांसाठी खुला ====» अमृतमहोत्सवी सत्कार सोहळा २०१८

संस्थेतर्फे बुधवार दि. १८ एप्रिल २०१८ (अक्षय तृतीया) रोजी श्री परशुराम जयंती या दिवशी अमृतमहोत्सवी सत्काराचे आयोजन करण्यात येत आहे.

तरी ज्या सभासदांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत किंवा ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे अशा ज्येष्ठ व्यक्तींची नांवे त्यांच्या कुटुंबीयांनी संपूर्ण माहितीसह काका गद्रे मंगल कार्यालयात १५ एप्रिल २०१८ च्या आत द्यावीत अशी विनंती कार्यकारी मंडळातर्फे करण्यात आली आहे.

धन्यवाद!
चित्तपावन ब्राह्मण संघ, नाशिकFirst « Previous 12 Next » Last

Chitpavan Brahman Sangh, Nashik
Chitpavan Brahman Sangh, Nashik
Copyright © NasikChitpavan All Rights Reserved.
Powered By: SSDGM